२८ डिसेंबर २००९ या सुदिनी आम्ही महा ई सेवा केंद्र,वडोद
बाजार ची सुरुवात केली. डोक्यात फक्त एकच विचार होता कि स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा आणि हा विचार मी घरी सांगितला. व घरच्याचा होकार मिळाल्यानंतर मी तयारीला लागलो. व्यवसायासंबधी सर्व
डॉक्युमेंटेशन पुर्ण करून आम्ही औंरंगाबाद येथिल पर्फेक्ट इन्फोसोल्युशन ला रामराम
करुन गांधीजीचा खेड्याकडे चला हा मंत्र (माझ्यावर प्रेम करणा-या हितचिंतकाचा व सल्लागारांचा विरोध डावलुन) स्विकारला. आणि केंद्र शासनाचे कॉमन सर्व्हिस सेंटर http://apna.csc.gov.in/index.php/component/content/article/54-csc-scheme/104-about-csc-spv.html म्हणजेच महा ई सेवा केंद्र चालु केले.
परंतु केंद्र सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती परंतु मनात स्वत:चा व्यवसाय चालु करण्याची उर्मी असल्यामुळे जागेअभावी आम्ही मारोती मंदिरासमोर पाच फुट रुंद व ९ फुट लांब आसलेल्या जिन्याखालील जागेत आमचे कार्यालय चालु केले.
परंतु केंद्र सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती परंतु मनात स्वत:चा व्यवसाय चालु करण्याची उर्मी असल्यामुळे जागेअभावी आम्ही मारोती मंदिरासमोर पाच फुट रुंद व ९ फुट लांब आसलेल्या जिन्याखालील जागेत आमचे कार्यालय चालु केले.
घरातील टिव्ही टेबल व एक निलकमल ची चेअर उचलुन कार्यालयातील
फर्निचर ची व्यवस्था केली. इन्टेल ऑटम चा बोर्ड प्रोसेसर ३००० रु, १ जिबी डिडीआर
टु रॅम ७५० रु, सिगेट १६० जिबी हार्ड डिस्क १७०० रु, इन्टेक्स कॅबिनेट ९०० रु/-
आणि १२०० रु मध्ये एक सेकंड हॅन्ड १५” सिआरटी मॉनिटर आणुन घरीच जोडणी करुण आम्ही
आमचे डेस्कटॉप सिस्टम ७५५० रु मध्ये तयार केली. आणि सोबत कॅनॉन एलबिपी २९०० लेझर
प्रिंटर ५५०० रुपयात नविन आनला. आणि लॉजिटेक कंपनीचा ४५० रु चा १२ मेगापिक्सल चा
वेबकॅम आणुन आम्ही महा ई सेवा केंद्राची पुर्वतयारी पुर्ण केली.
तद्नंतर आम्ही श्री. मनोज मुळे सरांच्या मदतीने सिएमएस
कॉम्पुटर्स लि चे जिल्हा व्यवस्थापक माननिय श्री जोशी सरांना भेटुन आवश्यक कागदपत्रे व डिपॉजिट
रक्कमेचे डीडी काढुन आम्ही
सिएमएस सोबत काम करण्यास सिद्ध झालो. या सर्व प्रकियेत फेब्रुवारी २०१० उजाडले व
प्रत्यक्ष कामास सुरुवात २२ फेब्रुवारी २०१० रोजी झाली.
आणि सर्विसेस जास्त नव्हत्या. खेळते भांडवल जास्त नव्हते (२०,०००) कामाचा पुर्वानुभव नव्हता.
कमिशन कमी होते आणि खर्च खुप होत होता. तरिही आम्ही हार न मानता काम चालुच ठेवले
डिटीपी वर्क (नेटभेट चे सलिल दादा यांच्या कृपेने, ब-हा साठी खुप खुप आभारी आहे
सलिलदादा) आणि नोकरी विषयक फॉर्म भरुन आम्ही तरत होतो. आणि नंतर मग G2C सर्विसेस चालु झाल्या.
सातबारा, एकुण जमिन दाखला, रहिवासी, उत्पन्न, वय अधिवास राष्ट्रियत्व, जात
प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ह्या सुविधा चालु होत्या. गावात फाईल तयार
करायच्या आणि तालुका सेतु सुविधा केंद्रात ते जमा करुन तेथे २ –या दिवशी
प्रमाणपत्र घेऊन जायचे अशी वेळखाऊ प्रकिया ६ महिने चालु होती. नंतर प्रमाणपत्रे
देखिल गावातच निघु लागले आणि अधिकारी देखिल सहकार्य करु लागले आणि प्रमाणपत्रे एका
दिवसातच मिळु लागले.
सिएमएस कॉम्पुटर्स लि. मध्ये बिटुसी सर्विसेस देखिल
चांगल्या येऊ लागल्या लाईट बिल भरणा केंद्र देखिल चालु झाले. महाऑनलाईन पोर्टल
द्वारे तर कमालच झाली. आणि २०१३ अखेरीस तर आता ई डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट अंतर्गत
प्रमाणपत्रावर डीजिटल सिग्नेचर होऊन येत आहे. महाराष्ट्र शासनाने देखिल आपल्या
विविध योजना जश्या आम आदमी विमा योजना, राजिव गांधी जिवनदायी आरोग्य योजना,
शिधापत्रिका वाटप योजना अशा योजना देखिल महा ई सेवा केंद्रा दवारे चालु केल्या. भारत
सरकारने देखिल आता अपना सिएससी या पोर्टल वर ब-याच सुविधा जसे की पॅन कार्ड, आधार
कार्ड, आणि पिएफआरडीए च्या सुविधा आणि बॅंकिग सुविधा देखिल सुरु केल्या.
आम्ही आमची चिकाटी न सोडता या सर्व सर्व्हिसेस सामान्य
जनतेला दिल्या आणि माननिय सरपंच श्री. गोविंद भाऊ वाघ यांनी मला 2012 या वर्षी २५० स्क्वे फिट चे जुने बिएसएनएल चे ऑफिस मला काम करण्यासाठी दिले. (भाऊ तुमचे मनापासुन आभार) आज आमच्या ग्राहकांच्या
कृपेने आम्ही ५,००,००० रु च्या मशिनरी सह ३ ऑपरेटर च्या स्टॉप सह
आपल्या सेवेत हजर आहोत. २००९ या आर्थिक वर्षा मध्ये आमची वार्षिक उलाढाल २०,०००
होती ती आज २०१३ या आर्थिक वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत ६,००,००० झाली आहे. आज आमचे ऑपरेटर च्या मदतीने आधार कार्ड नोंदणी
चे काम देखिल चालु आहे. www.wadodbazarcsc.netbhet.in
हि )वेबसाईट वेबसाईट साठी परत एकदा सलिल दादा चे आभार) देखिल आम्ही ग्राहकांच्या मदतीसाठी
चालु केली.
ग्राहकांना सुविधा देत असतांना आम्ही आमची सामाजिक बांधिलकी
देखिल जपली. २०१३ च्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत आम्ही दुष्काळ मदत गटाच्या
सहकार्याने आणि श्री. रवि घाटे सर व संतोष बोराडे सर यांच्या मदतीने संपुर्ण
फुलंब्री तालुक्यात फुलंब्री तालुका कोऑर्डिनेटर म्हणुन काम करत असताना दुष्काळग्रस्त नागरिकांना पिण्यासाठी स्वछ पाणी उपलब्ध व्हावे
म्हणुन स्पिन्टेक्स कंपनीच्या २००० लि. क्षमतेच्या पाण्याच्या १७ टाक्या वाटल्या.
व विविध सामाजिक संघटना मल्टिनॅशनल कंपन्याच्या सहकार्याने जलसंधारणाचे काही कामे
देखिल केलीत. मुक्या जनावराच्या चा-याचे देखिल वाटप केले. आणि या कामाबद्दल आमच्या दुष्काळ मदत गटाला आंतरराष्ट्रिय मंथन पुरस्कार २०१३ मिळाला.
आमच्या या चार वर्षाच्या प्रवासात आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभले त्या सर्व ज्ञात अज्ञात शुभचिंतकाचे आभार मानुन व आमच्या कडुन उत्तरोत्तर अशीच लोकसेवा घडावी ही देवाकडे शुभकामना करुन मी लेख संपवितो.