महा-ई-सेवाकेंद्राबाबत

My photo
Wadod Bazar, maharashtra, India
महा-ई-सेवा-केंद्राच्या माध्यमातुन वडोद बाजार,व परिसरातील गावकऱ्यांना सातबारा एकुण जमिनीचा दाखला,तहसिल खात्याचे विविध प्रमाणपत्रे,रेल्वे रिझर्वेशन,सर्व प्रकारचे रिचार्ज व्हाउचर मिळतील एल.आय.सी चे हप्ते भरता येतील.Light Bill Collection Center. पत्ता - महा-ई-सेवा-केंन्द्र, मारोती मंदीरासमोर पोष्ट ऑफिस शेजारी,वडोद बाजार,ता-फुलंब्री,जि.-औरंगाबाद. ४३११३४

माझी ओळख


मी रवि तोरणमल...!

वडोद बाजार हे आमचे गाव गिरीजा नदिच्या पाण्यामुळे व दर सोमवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारामुळे
पुर्ण जिल्ह्यात फेमस. ईथला मी रहिवासी 
     आता तुम्ही म्हणाल ब्लॉग च्या नावाबद्दल तर महा ई सेवा केंद्र ही एक केंद्र शासनाची संकल्पना
 आहे पुर्ण भारतात असे एक लाख CSC(common Service Center) आहेत. महाराष्ट्रात या CSC Project 
ला महा-ई-सेवा केंन्द्र हे नाव दिले आहे. (५ गावात एक केन्द्र) या केंद्राच्या माध्यमातुन ग्रामिण भागातील जनतेला
 तहसिल व जिल्हास्तरा वरिल सर्व शासकीय स सुविधा लाईट्बिल व फोनबिल भरणा L.I.C. PREMIUM, रेल्वे
 रिजर्वेशन, D.T.H. Recharge, Mobile  Recharge, शेतिविषयक s.m.s नोकरी विषयक माहिती Tahsil
 चे कास्ट सर्टीफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र ,सातबारा मतदार ओळखपत्रे, रेशणकार्ड असे ७५ प्रकारच्या सुविधा या
 केंद्रातुन देता येतात. तर आमच्या गावात हे केंन्द्र मी चालवतो.
बघा आवडते का...
आणि हो, तुमच्या अभिप्राय, सुचना, प्रतिक्रिया नक्की द्या...
मी वाट बघतोय...!
"  माझ्या लेखनातला प्रत्येक 'शब्द'
        माझ्या मनाचा आरसा आहे.
   त्याच्या प्रत्येक अक्षराला
        माझ्या भावनांचा वारसा आहे..!"

कळावे. लोभ असावा..
आपला ,